breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भाजपच्या अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची बिनविरोध निवड
नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी अपेक्षेप्रमाणे जे.पी. नड्डा यांची वर्णी लागली. यापूर्वी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शहा यांच्या काळात भाजपने आक्रमक विस्ताराचे धोरण अवलंबले होते. शहा यांच्या धोरणामुळे भाजपला अनेक राज्यांमध्ये यश मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून भाजप मुख्यालयात अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी केवळ जे.पी.नड्डा यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. सध्या जे पी नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात.