breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजपकडून मावळ विधानसभेचा निर्णय गुलदस्त्यात

पिंपरी |महाईन्यूज|

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी आज मंगळवारी जाहीर केली. यामध्ये भाजपने 125 तर शिवसेनेने 124 जणांची नावे प्रसिद्ध केली. यासोबतच पिंपरी चिंचवड, भोसरीमध्ये विधानसभेची उमेदवारी भाजप-शिवसेनाकडून जाहीर करण्यात आली. परंतु, मावळच्या जागेवर नाराजी टाळण्यासाठी अजुनही सस्पेंस ठेवला आहे.

विद्यमान आमदार चिंचवडमधून लक्ष्मण जगताप, भोसरीतून महेश लांडगे तर शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार यांना पिंपरीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मावळची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. स्वतः राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात चढाओढ सुरू असल्यामुळे बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही असे सांगितले जात आहे. मावळमधून कुणाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यातच आहे. दोन दिवसांत उमेदवारी जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button