breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

भल्या सकाळी अजित पवार शेताच्या बांधावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

बारामती – अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 7 वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पहाणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदीप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हानदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पहाणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button