breaking-newsराष्ट्रिय

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना भारत रत्न द्यावा; काँग्रेसची आग्रही मागणी

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने स्वातंत्र्यसैनिक वि.दा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर आता काँग्रेसने शहीद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न देण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. सोबतच चंदीगड विमानतळाला भगत सिंह यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हंटले कि, शहीद-ए-आझम भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना २६ जानेवारी २०२० रोजी भारतरत्न देण्यात यावे. सरकारने अधिकृतरीत्या शहीद-ए-आझमची पदवी देऊन त्यांचा सन्मान करावा. तसेच शहीद भगत सिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंदीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे त्यांनी केली आहे.

Manish Tewari✔@ManishTewari

My letter to H’onble Prime Minister @narendramodi formally requesting him to accord Bharat Ratna to Shaheed-E-Azam’s Bhagat Singh, Rajguru & Sukhdev.Formally Confer the honorific of Shaheed-E-Azam on them & dedicate Chandigarh Airport located in Mohali in memory of Bhagat Singhji

View image on Twitter

दरम्यान, याआधी मनीष तिवारी यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या मागणीवर निशाणा साधला होता. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेलाही हा सन्मान देण्याची मागणी का नाही करत? असा सवाल त्यांनी केला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षी भाजपच्या नेतृत्वाने यावर गंभीरपणे विचार करायला हवा, असेही ते म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button