breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्राझीलमध्ये चिनी लसीविरोधात जोरदार आंदोलन

रिओ दि जानेरो – संपूर्ण जग सध्या कोरोना लसीकडे डोळे लावून आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी लस महत्त्वाची आहे. मात्र असे असले तरी लसीकरणाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. लस उपलब्ध झाली तरी आपण ती टोचून घेणार नाही असे काहींचे मत आहे. याच मुद्यावरून ब्राझीलमध्ये रविवारी आंदोलन करण्यात आले. चिनी कंपनी सिनोव्हॅकची लस आणि लसीकरण बंधनकारक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यपालांविरोधात रविवारी साओ पावलोमध्ये ३०० जणांनी आंदोलन केले.

चीनकडून कोरोनावरील ४ कोटी ६० लाख लसी विकत घेणार असल्याचे ब्राझीलने मागच्या महिन्यात जाहीर केले होते. या निर्णयाला ब्राझीलमधल्या राज्यापालांचे समर्थन दिले होते परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उजव्या विचारसरणीचे बोलसोनारो यांनी ब्राझील लसी विकत घेणार नाही असे जाहीर केले. दरम्यान, सध्या सिनोव्हॅक ही चिनी औषध कंपनी ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्याची मानवी लस चाचणी करत आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी हे लसीकरण ऐच्छिक असल्याचे म्हटले आहे तर साओ पावलोच्या राज्यपालांची भूमिका या उलट आहे. त्यामुळे चिनी लस आणि लशीकरण बंधनकारक करण्याच्या विचारात असलेल्या साओ पावलोच्या राज्यपालांविरोधात रविवारी ब्राझीलमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button