क्रिडा

बॉल टॅम्परिंग प्रकरणी श्रीलंकेचा कर्णधार चंडिमलवर एका सामन्याची बंदी

कोलंबो : बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी ठरलेला श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दिनेश चंडिमलवर एका कसोटी सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बॉलसोबत छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने दिनेश चंडिमला दोषी ठरवले. सुरुवातीला श्रीलंकेच्या कर्णधाराने आरोप फेटाळाले होते. परंतु सुनावणीनंतर आयसीसीने बॉल टॅम्परिंग प्रकरणात त्याला दोषी ठरवले आहे.

शिक्षा म्हणून आयसीसीने चंडिमलवर मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. शिवाय वेस्ट इंडिजविरुद्ध बार्बाडोसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यावर बंदी घातली आहे. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ म्हणाले की, “फुटेज पाहिल्यानंतर स्पष्ट झालं आहे की, चंडिमलले तोंडात कोणतातरी पदार्थ टाकला आणि त्यानंतर तो चेंडूवर लावला. हे आयसीसीच्या आचारसंहिता 2.2.9 चं उल्लंघन आहे.”

वेस्ट इंडिजच्या सेंट लुसियामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंकेचा दिनेश चंडिमल बॉलवर कोणतातरी पदार्थ लावताना दिसला होता. सामना अधिकाऱ्यांनी शुक्रवारी खेळाच्या अखेरच्या सत्राचा रिप्ले पाहिल्यानंतर चंडीमलला आरोपी ठरवले. रिप्लेमध्ये चंडिमलने आपल्या खिशातून एक पदार्थ काढला आणि तोंडात घातला. त्यानंतर तो चेंडूवरही लावला. शनिवारी दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयसीसीने चंडिमलवर बॉलसोबत छेडछाड केल्याचा आरोप निश्चित केला होता. आयसीसीने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ही माहिती दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button