breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण! साडेपाच तासांनंतर दीपिका पादुकोणची चौकशी संपली

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर हजर झाली होती. तब्बल साडेपाच तासांच्या चौकशीनंतर आता ती एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर आली आहे. आजच्या चौकशीत तिने आपण ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली, मात्र ड्रग सेवन केल्याचे अमान्य केले आहे. दरम्यान, एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर दीपिका प्रचंड तणावात दिसत होती. आज सकाळी पावणे दहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात ती दाखल झाली होती. त्यानंतर १० वाजता तिची चौकशी सुरू झाली.

एनसीबीने चौकशीपूर्वी दीपिकाकरून फोनही काढून घेतला होता. त्यामुळे तिला चौकशी सुरू असेपर्यंत कुणाशीही फोनवरून संवाद साधता आला नाही. तसेच दीपिकाची मॅनेजर करिश्माला तिच्यासमोर बसवून तिची चौकशी करण्यात आल्याचे समजते आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एकूण पाच अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दीपिकाच्या एनसीबी चौकशीचा दिवस असल्याने सकाळी तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. त्यानंतर आज सकाळी सर्वांना चकवा देत तोंडाला मास्क लावून दीपिका एका साध्या गाडीतून चौकशीच्या १५ मिनिटे आधीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली.

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना बोलावणे धाडले. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंहला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले. समन्स मिळाल्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरुवारी मुंबईत दाखल झाली. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले होते. त्यानुसार आज तिची चौकशी झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button