breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

बीडमध्ये भाजपला धक्का: माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा राजीनामा

बीड : जळगावमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत  (NCP)प्रवेश करून भाजपला धक्का दिला आहे. आता माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ) यांच्या बीडमध्ये भाजपला आणखी धक्का बसला आहे. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड

यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. या  निवडणुकीसाठी भाजपाकडून जयसिंग गायकवाड इच्छुक होते. पण, उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंग गायकवाड कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी केली आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

जयसिंग गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडचे खासदार तसेच पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहे.  त्यामुळे जर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर बीडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्येही भाजपमध्ये बंडखोरी

विशेष म्हणजे, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली. या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं.

भाजपनं शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना प्रवीण घुगे व रमेश पोकळे यांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमध्ये बंडाळीचा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना फायदा होऊ शकतो, असंही बोललं जात आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button