breaking-newsपिंपरी / चिंचवड

बावधनमध्ये चुलीवर स्वयंपाक करताना स्फोट; मुलगी गंभीर जखमी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चुलीवर स्वयंपाक करताना अचानक स्फोट झाला. यावेळी स्वयंपाक करत असलेली मुलगी गंभीर भाजली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास बावधन येथील मर्सिडीज बेंझ शोरूमच्या मागे घडली.

हसीना (वय 15) असे जखमी मुलीचे नाव आहे. तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदरनिर्वाहासाठी बाहेरून आलेल्या मोकळ्या जागेत पाल ठोकून राहत असलेल्या झोपडीमध्ये हा स्फोट झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनाचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी आले आहे. त्यांनी बावधन येथे मर्सिडीज बेंझ शोरूमच्या मागच्या बाजूला पाल ठोकले आहे. हसीना दुपारी बाराच्या सुमारास पालामध्ये चुलीवर स्वयंपाक करत होती. अचानक मोठा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. रानडुकरांचा शिकार करण्यासाठी वापरली जाणारी गोळी मुलीने चुलीत टाकल्याने हा स्फोट झाला असल्याची चर्चा आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button