breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बापरे! लॉकडाऊनमध्ये झालं होतं लग्न, ‘क्वारंटाइन’ असतांनाच पोलिसाने घेतला टोकाचा निर्णय

जमशेदपूर: झारखंड मधल्या जमशेदपूरमध्ये होम क्वारंटाइन असलेल्या एका पोलीस जवानाने आत्महत्या केल्याने खळबळ उडालेली आहे. या जवानाचं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं होतं. पोलीस कर्मचारी वसाहतीत तो पत्नीसोबत क्वारंटाइन होता. सोमवारी अचानक त्याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं आहे.

त्यामुळे त्याच्या कुटुबीयांना मोठा धक्का बसला असून पत्नीची तर प्रकृतीच बिघडली आहे. तरुण पांडे असं त्या पोलिसाचं नावं आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा तो रहिवासी होती. एक उत्तम खेळाडू म्हणूनही तो ओळखला जात असे. नॅशनल चॅम्पियन झाल्यानंतर त्याला थेट पोलीस विभागात नोकरी मिळालेली होती. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button