breaking-newsराष्ट्रिय

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या माओवाद्याची हत्या

झारखंड येथील पलामू जिल्ह्यात एका माओवाद्याची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. इरमू गावातील एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या माओवाद्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. यात त्या माओवाद्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, मृत आरोपीची ओळख पटली असून तो झारखंड जनमुक्ती परिषदेचा (जेजेएमपी) सदस्य अनिल सिंह असून तो जेजेएमपीचा प्रमुख पप्पू लोहराचा जवळचा नातेवाईक आहे.

अनिल गावात येऊन महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी आले. त्यांनी अनिलला बेदम मारहाण केली. यात अनिलचा मृत्यू झाला. अनिलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक इंद्रजीत महथा यांनी दिली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button