breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बनावट प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर ; वकील फरार घोषित

पुणे – रोझरी एज्युकेशनचे संचालक विनय अरान्हा यांची बनावट सही करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अ‍ॅड. सागर सूर्यवंशी यांना शिवाजीनगर पोलिसांनी फरार घोषित केले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अ‍ॅड. सूर्यवंशी यांच्यासह शीतल किशननंद तेजवानी यादेखील फरार आहेत. तर, नोटरी अ‍ॅड़ निवृत्ती मुक्ताजी यांची ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर अ‍ॅड. प्रियंका दिलीप शेलार (३४, रा. अगरवाल बिल्डींग, नाणेकरचाळ, रेल्वे स्टेशन रोड, पिंपरी) यांना यापूर्वी अटक केली आहे. २०१६ साली हा सर्व प्रकार घडला होता. दरम्यान, हा फरार असलेले अ‍ॅड. सूर्यवंशी खुलेआम विविध कार्यक्रमांना भेट देत आहेत. त्यामुळे त्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी विनय विवेक आरान्हा (वय ४४, रा. नेपियर रोड, पुणे) यांनी केली आहे. अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात केवळ अर्ज केला आहे. त्याचा शोध सुरू असून तो सापडल्यास त्याला त्वरित अटक करणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे यांनी दिली.

अ‍ॅड. सूर्यवंशी व त्यांची पत्नी शीतल तेजवानी यांनी रोझरी एज्युकेशन ग्रुपचे विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्सचे दाखल दाव्यात सूर्यवंशी यांनी अ‍ॅड. शेलार यांच्या मदतीने आरान्हा यांचे खोटे वकीलपत्र व प्रतिज्ञापत्र तयार केले. त्यावर आरान्हा यांची खोटी सही करून नोटरी नोंद करून त्यांची फसवणूक केली. एकतर्फी आदेश मिळविण्याच्या उद्देशाने न्यायालयाची दिशाभूल केली, अशी फिर्याद आरान्हा यांनी दिली आहे.

खोट्या सामंजस्य कराराच्या आधारे जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात अ‍ॅड. सूर्यवंशी, अ‍ॅड. शर्मिला पी. गायकवाड, शाहबाज अजिज शेख (दोघेही रा. हरमेज हेरीटेज फेज -२, शास्त्रीनगर) आणि सैयदनेफुल्ला हुसेनी (रा. एचएन ८-१, वृंदाकॉलनी तोली चौक, हैदराबाद) यांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी केविन अँथोनी पिंटो (वय ५३, रा. सुखवस्तू, अर्चना हिल टाऊन, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पिंटो व त्यांच्या आई पलॉरेन्स पिंटो यांनी त्यांची लोहगाव येथे असलेली २८.१६ हेक्टर
जमीन जून १९८०मध्ये हरीश मिलानी यांना डीड आॅफ कन्फर्मेेशनद्वारे विकली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button