breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : यावेळी तरी विजेत्या संघाला चांगली वागणूक मिळेल…

माजी विश्‍वविजेते गॉर्डन बॅंक्‍स यांना आशा 

लंडन  – आम्ही विश्‍वचषक जिंकून मायदेशी परतलो, तेव्हा आमचे व्यवस्थित स्वागतही झाले नव्हते. आम्हाला चांगली वागणूकही मिळाली नव्हती. त्यामुळे आम्ही खूप नाराज झालो होतो. मात्र यंदा इंग्लंडने विश्‍वचषक जिंकला तर या वेळी तरी विजेत्या खेळाडूंना चांगली वागणूक मिळेल, अशी आशा इंग्लंडच्या 1966 फिपा विश्‍वचषक विजेत्या संघाचे गोलरक्षक गॉर्डन बॅंक्‍स यांनी व्यक्‍त केली आहे.

गॉर्डन बॅंक्‍स यांनी इंग्लंड संघाकडून 73 सामने खेळले. मात्र 1972 मध्ये मोटार अपघातामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. त्यामुळे त्याचे फुटबॉलमधील करीयर तेथेच संपुष्टात आले होते. 1970 विश्‍वचषक स्पर्धेत पेले यांचा हेडर रोखल्यामुळे बॅंक्‍स प्रकाशझोतात आले होते. इंग्लंडचा संघ सध्या विश्‍वचषकाचा दावेदार समजला जात असून उपान्त्य फेरीत त्यांचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. परंतु त्यापूर्वीच इंग्लंडमध्ये विश्‍वचषक विजयाची तयारी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

सध्या 80 वर्षांचे असलेल्या गॉर्डन बॅंक्‍स यांनी टेलिग्राफ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही 1966 फिफा विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य जर्मनीचा 4 विरुद्ध 2 असा पराभव करत विश्‍वचषक जिंकून इतिहास रचला. आम्हला वाटले होते की, आमचे मायदेशात प्रचंड प्रमाणात स्वागत होईल. मात्र, आमच्या संघाचे अपेक्षेप्रमाणे स्वागत झाले नव्हते. इंग्लंडच्या फुटबॉल संघटनेनेने आमच्यासाठी काहीच केले नाही, त्यांनी विश्‍वचषक विजेत्यांना जी वागणूक दिली त्यामुळे आम्ही खूपच निराश झालो होतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button