breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : कोलंबिया आणि इंग्लंडमध्ये आज घमासान

मॉस्को– गटसाखळीमध्ये अव्वल कामगीरी करत बाद फेरीत दाखल झालेल्या कोलंबियासमोर आज तितक्‍याच बलाढ्य अशा इंग्लंडचे आव्हान असणार आहे.

प्रत्येक प्रमुख स्पर्धामध्ये इंग्लंडच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा केल्या जातात. किंबहुना तशी वातावरणनिर्मिती केली जाते, परंतु प्रत्येक वेळी हाती निराशाच येते. पात्रता फेरीत त्यांना स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया आणि स्कॉटलंड या तुलनेने कमकुवत संघांचा सामना करावा लागला होता. मात्र, मुख्य स्पर्धेत त्यांनी पनामाचा 6-1 आणि ट्युनिशियाचा 2-1 असा पराभव केला मात्र, बेल्जियम विरुद्ध त्यांना 1-0 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे स्पर्धेत चांगली कामगीरी केली अस्दली तरी आजच्या सामन्यात त्यांच्या कामगीरीवर सर्वांची नजर असणार आहे. प्रमुख खेळाडू म्हणुन त्यांच्या हॅरी केन सोबतच डेल अली, एरिक डीएर, कायरेन ट्रिपर आणि ऍश्‍ली यंग यांच्याकडून मोठया अपेक्षा असणार आहेत.

दुसरी कडे कोलंबियाच्या संघाने दक्षिण अमेरिका गटात चौथे स्थान पटकावताना आपला विश्‍वचषक प्रवेश निश्‍चित केला. आजच्या सामन्यात त्यांची संपूर्ण मदार बचावफळीवर असणार आहे. डेव्हिडसन सांचेझ आणि येरी मिना हे अनुक्रमे 21 व 23 वर्षांचे खेळाडू कोलंबियाचे प्रमुख अस्त्र आहेत. त्यांना अनुभवी जोस नेस्टर पेकरमनची साथ आहेच. शारीरिक तंदुरुस्ती आणि कौशल्यपूर्ण खेळ, ही त्यांची मजबूत बाजू असून जेम्स रॉड्रिगेज याला विसरून चालणार नाही. मधल्या फळीतील प्रमुख शिलेदार आणि मोक्‍याच्या क्षणी गोल करण्याची धमक असणाऱ्या या खेळाडूवर सर्वांचीच नजर असणार आहे.

1930पासून आजतागायत झालेल्या 21 विश्वचषक स्पर्धामध्ये 1966चा अपवाद वगळता इंग्लंड संघाला कधीही विश्वचषक जिंकता आलेला नाही. किंबहुना त्यांना गेल्या 52 वर्षांत कधीही उपांत्य सामना खेळता आलेला नाही. मागील दोन विश्वचषक स्पर्धेत तरी त्यांना गटातून बाद फेरीतही प्रवेश मिळवता आलेला नाही. युरोपीयन चषक स्पर्धाही त्याला अपवाद नाहीत. या स्पर्धा इंग्लंड संघाला कधीही जिंकता आलेल्या नाहीत.

इंग्लंड संघाची या स्पर्धेतील जमेची बाजू म्हणजे अलेक्‍झांडर अरनॉल्ड, गॅरी कॅहिल, फॅबियन डेल्फ, हॅरी मॅग्युअर या खेळाडूंमुळे असलेली मजबूत बचावफळी. मध्यफळीत डेले अली, एरिक डायर, हेन्डरसन, लिनगार्ड हे आपले काम चोख पार पाडत आहेत, तर सर्वात जमेची बाजू म्हणजे कर्णधार हॅरी केन, स्टेरिलग, मार्कस्‌ रशफोर्ड हे आक्रमण फळीत खेळत आहेत. स्पर्धेतील सर्वात जास्त गोल सध्या हॅरी केनच्या नावावर आहेत.

इंग्लंड संघाच्या दृष्टीने उपांत्य पूर्व व उपांत्य सामना हा अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यात त्यांनी अभ्यासपूर्वक व्यूहरचना करणे आवश्‍यक आहे. या संघाची अशीच कामगिरी जर कायम राहिली तर नक्कीच या वेळच्या विश्वचषकावर इंग्लंड संघ नाव कोरेल अशी खात्री आहे. त्यानिमित्ताने इंग्लंडच्या यापूर्वीच्या खेळाडूंचे अपयश धुऊन काढण्याची संधी हॅरी केन, प्रशिक्षक साऊथगेट व संघातील खेळाडूंना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button