breaking-newsमनोरंजनमुंबई

फरहान अख्तरने केला ट्विटरवरुन विरोध तर आयपीएस अधिकाऱ्याने दिली कायद्याची समज

मुंबई | महाईन्यूज

संपूर्ण देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात विरोध प्रदर्शने सुरु आहेत. जामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर देशभरात संतापाची लाट पसरलेली आहे. CAA कायद्याविरोधात आता बॉलिवूडमधील अभिनेतेही समोर येऊन मतप्रदर्शन करत आहेत. आयुषमान खुराणा, राजकुमार राव, परिणीती चोपडा, आलिया भट्ट यांच्यासह दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही यावर भाष्य केलेलं आहे.

यामध्ये बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर यांनी ट्विट करत आंदोलनकर्त्यांना ऑगस्ट क्रांती मैदानात जमण्याचं आवाहन केलेलं आहे. देशभरात सुरु सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात होणारं आंदोलन का होतंय? हे जाणून घेणं गरजेचे आहे व त्यासाठी १९ डिसेंबरला ऑगस्ट क्रांती मैदानात यावं व फक्त सोशल मीडियात विरोध करण्याची वेळ आता राहिली नाही असं अख्तरने म्हटलेलं आहे.

https://twitter.com/FarOutAkhtar/status/1207143874138910720

फरहानच्या या ट्विटनंतर आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, तुम्ही केलेलं ट्विट हे कायद्याचं उल्लंघन करणारे आहे याची माहिती असणं गरजेचे आहे. आयपीसी कलम १२१ अंतर्गत हा गुन्हा होऊ शकतो असं सांगत त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. तुम्ही केलेलं ट्विट अनावधानाने केलं नसावे आणि मुंबई पोलीस आणि एनआईएचं आपल्यावर लक्ष आहे. त्यामुळे ज्या राष्ट्राने तुम्हाला सर्वकाही दिलं त्याचा विचार करा आणि कायदा समजून घ्या असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button