breaking-newsआंतरराष्टीय

फटाक्यांच्या आतषबाजीत न्युझिलंडमध्ये नववर्षाचे सर्वप्रथम स्वागत

सरत्या वर्षातील शेवटचा सुर्यास्त काही वेळातच होणार आहे, त्यानंतर मध्यरात्रीनंतर नव्या वर्षाची पहाट होईल. मात्र, न्युझिलंडमध्ये नव्या वर्षाची मध्यरात्र उलटली असून इथल्या जनतेनं नव्या २०१९वर्षांच जल्लोषात स्वागत केलं आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

New Zealand’s Auckland welcomes the new year with fireworks

८८ लोक याविषयी बोलत आहेत

पूर्वेकडील देशांमध्ये एकामागून एका काही वेळांच्या फरकाने नव्या वर्षातला पहिला दिवस उजाडणार आहे. त्यामुळे हळूहळू सगळीकडे जल्लोषाला सुरुवात होईल. मात्र, जगात पहिल्यांदा हा नवा दिवस (मध्यरात्र) न्युझिलंडमधील ऑकलंड येथे झाली असून तेथे जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

ऑकलंडमधील ठिकठिकाणी उंच इमारती, पुल आणि सार्वजनिक ठिकाणी लोक अंधाऱ्या रात्री आकाशात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करीत आहेत. त्याचबरोबर तरुणाईसोबतच अबालवृद्धांनी चौका-चौकांमध्ये जमण्यास सुरुवात केली असून डान्स आणि पार्ट्यांसोबत नववर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली आहे.

भारतापासून न्युझिलंडच्या वेळेमध्ये साडेसात तासांचा फरक आहे. न्युझिलंडचे घड्याळ हे भारताच्या पुढे आहे. त्यामुळे सध्या भारतात पाच वाजले आहेत तर न्युझिलंडमध्ये मध्यरात्रीचे साडेबारा वाजले आहेत. त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी ही वेळ हळूहळू भारताच्या बाजूला सरकणार आहे. तसतसा न्युझिलंडचा दिवस पुढे जात राहिल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button