breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

प्रेयसीच्या भावाने केला विवाहित प्रियकराचा खून, भाऊ पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – तरुणाने बहिणीच्या माजी प्रियकराची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. विवाहित प्रियकराने प्रेयसीच्या लग्नाला विरोध केला होता. यामुळे संतापलेल्या प्रेयसीच्या भावाने प्रियकराचा खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दिघी येथे ही घटना घडली. याप्रकरणी प्रेयसीच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. युवक वाघमारे असं मृत प्रियकराचं नाव असून संतोष चौधरी असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवक वाघमारेचे आरोपी संतोषच्या बहिणीसोबत गेल्या दीड वर्षापासून प्रेमसबंध होते. युवक वाघमारेने आपलं लग्न झाल्याचं प्रेयसीपासून लपवलं होतं. त्याला एक मुलगीदेखील आहे. युवकच्या पत्नीला यासंबंधी कळताच तिने प्रेयसिला याबाबत सांगितलं. तिने यासाठी आपल्या लग्नाचा व्हिडीओही व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला होता. आरोपी संतोषच्या कुटुंबियांचाही या प्रेमसंबंधाला विरोध होता. संतोष याने बहिणीला युवकशी न बोलण्याची ताकीद दिली होती.

संतोष आणि कुटुंबीय बिहारमधील मूळ गावी जाऊन बहिणीचा विवाह लावणार होते. युवक वाघमारेचा या लग्नाला विरोध होता. यासाठी त्याने प्रेयसीचं घर गाठलं आणि गोंधळ घालत सर्वांचा खून करेल अशी धमकी दिली. याच रागातून प्रेयसीच्या भावाने म्हणजे संतोष चौधरी याने युवकच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली. हल्ल्यात युवकचा जागीच मृत्यू झाला. आरोपी संतोषला दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button