breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

प्रियंका गांधीचे पती रॉबर्ट वॉड्रा राजकारणात येणार?

नवी दिल्ली – देशभरात निवडणुकीची उलथापालथ सुरू असताना आता काँग्रेसच्या नवनिर्वाचित महाचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वॉड्रा हेसुद्धा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनीच सोशल मीडियामधून दिले आहेत.

वॉड्रा यांनी आज केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनी लाँड्रींग प्रकरणातील सर्व आरोप संपले की, देशवासीयांच्या सेवेमध्ये मी मोठी भूमिका घेणार आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये मला खरे प्रेम आणि सन्मान मिळाला आहे. या सर्वांचा अनुभव आणि शिक्षण व्यर्थ जाऊ शकत नाही. ते चांगल्या वापरासाठी ठेवले पाहिजे. एकदा माझ्यावर केलेला आरोप हटविले की, मी देशवासीयांच्या सेवेमध्ये मोठी भूमिका घेणार आहे, असे वॉड्रा यांनी म्हटले आहे. त्यांनी आज केलेल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button