breaking-newsपुणे

प्राध्यापकानं जाळली पदवीची सर्व प्रमाणपत्रं

पुणे – सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजमधील एका प्राध्यापकाने त्यांची दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सर्व कागदपत्रे जाळून टाकली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.

सुरज माळी असे त्या प्राध्यापकांचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील सिंहगड कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. त्यांचे शिक्षण बीई, एमई झाले आहे. इतके उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून नोकरी करताना अत्यंत विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत घेतलेल्या या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही अशा अस्वस्थतेतून त्यांनी त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून टाकली आहेत.

हातामध्ये सर्व शैक्षणिक पदव्यांचा गठ्ठा घेऊन घरातील गॅसवर ते एक-एक प्रमाणपत्र जाळून टाकत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘गेल्या दीड वर्षांपासून कॉलेजकडून नियमित पगार देण्यात आलेला नाही. पगाराची ४ ते ५ लाखांची रक्कम थकीत आहे. त्यातच आता कामावरून कमी करण्यात येत असल्याची एक महिन्यांची नोटीस देण्यात आली आहे. इतके शिक्षण घेऊनही ही अवस्था वाटयाला आली आहे. सिंहगडच्या प्राध्यापकांना आता कुणी कर्जही देईना झाले आहे. त्यामुळे मिळालेल्या पदव्यांचा काही अर्थच वाटत नाही.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button