breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ

पुणे | पुण्यात कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सीलेट या कंपनीला आग लागली. काल रात्री पावणे दोनच्या सुमारास अचानक या कंपनीत आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीत आग लागल्याने मोठ्याने स्फोटाचे आवाज येत होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेचा अहवाल मागितला.

आग आणि स्फोटाची तीव्रता भयानक होती. साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावरून आग आणि धुराचे लोट दिसून येत होते. कंपनी गावापासून जवळच असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी गाव सोडून पळण्याची भूमिका घेतली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव इतर आजूबाजूच्या कंपन्यातील कामगारांना बाहेर सोडण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीत प्रचंड प्रमाणात रासायनिक (केमिकल) साठा होता. तो जळून खाक झाला आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी वारंवार घडणाऱ्या आग व स्फोटाच्या घटना थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनास्थळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कुरकुंभ, दौंड नगरपरिषद, बारामती एमआयडीसी येथील अग्निशमन बंब दाखल झाले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button