breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे पोलीस दलातील ‘भगोडे’ पोलिसांचे निलंबन; उपायुक्त नम्रता पाटील यांचा दणका

पुणे । प्रतिनिधी

औंध परिसरातील एका सोसायटीत शिरलेले चोरटे माघारी जात असताना त्यांचा प्रतिकार न केल्याचा ठपका ठेवत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी संदर्भातील आदेश काढला आहे. पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

चोरांची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखलही झाले. परंतु त्यांनी या चोरांना रोखले नाही किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात केलेल्या अधिक चौकशीनंतर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य करीत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून आरोपी मुद्देमाल, शस्त्र कटावनी आणि इतर साहित्य घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहेत. त्यावेळी पोलीस हवालदार प्रवीण गोरे यांनी आरोपींना पाहून दुचाकी वळवून निघून गेले. तर दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे वाहन निघून जाण्याआधी गोरे पोलीस हवालदार अवघडे यांना एकटे सोडून निघून गेल्याचे दिसत आहे. पोलीस नाईक अनिल अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असूनही त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button