breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे साैदागरला महिलासाठी स्वतंत्र तेजस्विनी बस सेवा सुरु

पिंपरी ( महा ई न्यूज ) – जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील महिलांसाठी ‘स्वतंत्र तेजस्विनी बस’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या तेजस्विनी बसचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंदाताई भिसे, कुंदाताई भिसे, सुप्रियाताई पाटिल, गितांजलीताई कडते, सुरेखाताई काटे, प्राजक्ताताई झिंजुर्डे, कांताबाई भिसे, कौसा झिंजुर्डे, जयश्री झिंजुर्डे, शीतल झिंजुर्डे, शिल्पा झिंजुर्डे, स्वाती झिंजुर्डे, वैशाली झिंजुर्डे, शारदा काटे, अश्विनी काटे, कविता भिसे, अनिता भिसे, विजयमाला सावंत, प्रीति सिंग, सुष्मा जाचक, मंगल भिसे, शोभा काटे, रूपा मुरकुटे, प्रज्वला शेलार, कलाबाई कुटे, नुतन कुटे, मंदा कुटे, भारती कुटे, अंजना कुटे, बबीता कुटे, कल्पना कुटे, सुवर्णा कुटे, सुरेखा कुटे, मिरासे ताई, इंदु सुर्यवंशी, मनीषा शिर्के, शीतल पटेल, दिपा पुजारी, करूणा तिवारी, जाधवताई, मंजुशाताई, योगिता नाशिककर, दिपा पवार, रेष्मा दळवी, कुलकर्णीताई व विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या.

यावेळी नगरसेविका निर्मलाताई कुटे म्हणाल्या की, पिंपळे सौंदागरचा ‘स्मार्ट सिटी’ मध्ये समावेश करण्यात आला. पिंपळे सौदागर ह्या क्षेत्रामध्ये ७० टक्के लोकसंख्या ही आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्ग असून यामध्ये महिला नोकरदार वर्गाचा ही मोठा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत फक्त महिलांसाठी पिंपळे सौदागर-रहाटणी येथून कुणाल आयकॉन रोड मार्गे ‘तेजस्विनी’ ही बस सुरू करण्यात यावी अशी मागणी मी स्वतः आणि शत्रुघ्न काटे यांनी केली होती. तसा लेखी प्रस्ताव पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापक विभागाकडे पाठवला होता. त्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ह्या बसवरील प्रथम महिला वाहक आदिती भागवत यांचा सत्कार करण्यात आला. निर्मलाताई कुटे यांनी सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button