पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त – 3 पदावर पदोन्नती मिळावी
![पिंपरी चिंचवडमध्ये आज 128 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-6.jpg)
आयुक्त श्रावण हर्डिकर यांना सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांची मागणी
पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त – 3 हे पद अद्याप रिक्त आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांची सेवानिवृत्त झाल्यानंतर गेल्या चार महिन्यापासून सेवाज्येष्ठतेनूसार पदोन्नती दिलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त – 3 या पदावर मला पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी केली आहे.
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना त्यांनी सोमवार (दि.9) रोजी पत्र दिले. त्यानूसार त्यांनी ही मागणी केली आहे. त्यात म्हटले की, महानगरपालिकेतील विविध पदांच्या नवीन आकृतीबंध राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. तसेच सर्व पदाच्या सेवा प्रवेश नियमावली देखील मंजुरी दिली आहे.
त्यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील नव्याने अतिरिक्त आयुक्त पदांच्या संख्येमध्ये 1 पद वाढवून एकूण 3 अतिरिक्त आयुक्त पदे करण्यात आलेली आहेत. सदरील शासन निर्णयानूसार नमुद अतिरिक्त आयुक्त या पदाकरिता महापालिकेत प्रसिध्द केलेल्या सहायक आयुक्त पदाच्या सेवाज्येष्ठता यादीनुसार हे पद भरले जावे. तसेच मला अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी केली आहे.