breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील खासगी संस्थाची सर्व कोविड सेंटर होणार बंद

महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन आरोग्य वैद्यकीय विभाग घेणार निर्णय

एक नोव्हेंबरपासून कोविड सेंटर बंदचे देणार आदेश?

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामध्ये कोरोनामुक्तांची संख्या वाढत असून, नवीन रुग्णांची संख्या घटत आहे. अनेक रुग्ण होम आयसोलेशनचा (घरीच राहून उपचार) पर्याय निवडत आहेत. त्यामूळे महापालिकेचे वायसीएम रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर, आॅटो क्लस्टर, बालनगरी कोविड सेंटरमधील बेड रिकामे पडले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच कोविड सेंटर बंद करण्यात आली. त्यानंतर 10 कोविड सेंटरपैकी एक-दोन वगळता अन्य सर्वच कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहेत.

शहरात मार्च महिन्यात पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर जूनपर्यंत कोरोना रुग्णांची स्थिती आटोक्यात होती. मात्र, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. दररोज बाराशे ते दीड हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आहे. तसेच महापालिकेने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमातून घरोघरी तपासणी होत आहे. संशयितांच्या घशातील नमुने तपासण्यात येत आहेत. या उपक्रमात 25 लाख लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सुमारे 18 लाखांवर नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात केवळ तीनशेहून अधिक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली. मनुष्यबळा अभावी ते खासगी रुग्णालये, स्वयंसेवी किंवा सामाजिक संस्थांना तीन महिने कालावधीसाठी चालविण्यास देण्यात आली. 1 आॅगस्ट ते 31 आॅक्टोबर पर्यंत त्यांना कामाचा आदेश देण्यात आला. मात्र, मुदतीपुर्वच पाच कोविड सेंटर आरोग्य वैद्यकीय विभागाने बंद केली. त्यानंतर रुग्ण संख्या घटत चालल्याने आता खासगी सर्वच कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे.

महापालिकेने डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह रावेत, मागावसर्गीय मुलांचे वसतिगृह मोशी, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह मोशी, घरकुल इमारत क्रमांक डी पाच ते आठ, बी 10 व 12, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, म्हाडा वसाहत महाळुंगे सी-11, बी-11 व 12, ए-11, बालेवाडी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, पीसीसीओपी वसतिगृह आकुर्डी, इन्फ्रास्ट्रक्‍चर लोकोटेड आणि हॉटेल क्रिस्टल कोर्ट आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत.

ते चालविण्यासाठी ट्रस्ट हेल्थ केअर, आयकॉन हॉस्पिटल, डीवाईन हॉस्पिटल, डॉ. भिसे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रुबी अलकेअर सर्विसेस, बीव्हीजी इंडिया, आयुश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक्‍सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्‍नोलॉजी कंपनी या संस्था आहेत. त्यांना प्रतिबेड प्रतिदिवस मंजूर दराप्रमाणे तीन महिने कालावधीचे शुल्क देण्यात येणार आहे.

शहरात एक हजार 991 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजारांपर्यंत सक्रिय रुग्ण असून, साडेतीन हजार रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. कोणतेही लक्षणे नसलेले दोन हजार रुग्ण होम आयसोलेट आहेत. त्यामुळे महापालिकेने यापुर्वी महाळुंगे म्हाडा वसाहत, इंदिरा कॉलेज ताथवडे, डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह, ईएसआय रुग्णालय चिंचवड, सिंबायोसिस कॉलेज किवळे येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

हे कोविड सेंटर होणार बंद?

मागावसर्गीय मुलांचे वसतिगृह मोशी, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह मोशी, घरकुल इमारत क्रमांक डी पाच ते आठ, बी 10 व 12, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, बालेवाडी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, पीसीसीओपी वसतिगृह आकुर्डी, इन्फ्रास्ट्रक्‍चर लोकोटेड आणि हॉटेल क्रिस्टल कोर्ट आदी ठिकाणीही कोविड केअर सेंटर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button