breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी पुरवठा वितरणास ठेकेदारी पध्दतीने मजूर पुरवठ्यास मुदतवाढ

स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिका पाण्याच्या टाकीवरील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेस ठेकेदारी पध्दतीने मजुर पुरविण्यासाठी पाच महिने मुदतवाढ देणे आणि एक कोटी 17 लाख 82 हजार रुपये वाढी खर्चास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. 

ड क्षेत्रीय कार्यालयातर्गंत सन 2017-18 चिंचवडच्या मुख्य गुरुत्ववाहिनी वरील जलक्षेत्र क्र.9 ते 15 आणि बी 8 पाण्याच्या टाकीवरील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पध्दतीने मजूर पुरविणे, या कामांचा निविदा काढण्यात आली होती. यामध्ये पिंपरीगाव, पिंपळे साैदागर, वैदुवस्ती, नवी व जूनी सांगवी, दापोडी परिसर या कामाचा आदेश ठेकेदार मे. मधुर महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित यांना 30 डिसेंबर 2017 रोजी दिला होता. त्या कामाची मुदत नऊ महिने होती. त्यानूसार 29 सप्टेंबर 2018 पर्यंत होती.

सध्यस्थितीत व्हाॅल्व आॅपरेशन करण्यास मजूर पुरविणे या कामाचे शेड्युल बी अपलोड केले आहे. नोव्हेंबर 2018 च्या तिस-या आठवड्यात निविदा प्रसिध्द करणेत येत आहे. निविदा प्रसिध्द करुनही कार्यवाही होऊन प्रत्येक्ष कामाचा देश प्राप्त होण्यास किमान 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे फेबुवारी 2019 अखेर मुदतवाढ देण्यात यावी, तसेच मुळ मुदतीत एकूण 87 लाख 79 हजार 797 रुपये खर्च आणि वाढीव पाच महिन्यात 64 लाख 63 हजार 990 रुपये खर्च अपेक्षित आहे.  त्यामुळे सदरील सुधारीत अंदाजपत्रकीय एक कोटी 52 लाख 44 हजार इतकी वाढीव रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button