breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाच महिन्याच्या कालखंडानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एसटी धावणार

धुळे | एसटीची उद्या (सोमवार, 14 सप्टेंबर) पासून आंतरराज्य सेवा सुरू होणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे. एसटीच्या धुळे विभागातून उद्यापासून धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत अशी आंतर राज्य बस सेवा सुरू होत आहे. यासाठीचं नियोजन एसटीच्या धुळे विभागाकडून करण्यात आलं आहे. एका सीटवर एकच प्रवाशी या प्रमाणे एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे.

प्रवाशांना एसटीत बसल्यानंतर देखील मास्कचा वापर करणं आवश्यक राहणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, तसेच मध्यप्रदेशसाठी देखील आंतरराज्य बस सेवा सुरू होणार आहे. हळूहळू सर्वच मार्गांवरील एसटीची सेवा सुरळीत सुरू होणार आहे. 23 मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. साधारण पाच महिन्यांच्या कालावधी नंतर एसटीची आंतरराज्य बस सेवा पुन्हा सुरु झालीय. 20 ऑगस्ट पासून एसटीची आंतर जिल्हा बस सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर आता आंतर राज्य बस सेवा सुरु झाल्यानं एसटीची सेवा सुरळीत सुरु होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button