breaking-newsआंतरराष्टीय

पंतप्रधानांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक

राज्यसभेचे अडीचशेवे सत्र सोमवारी सुरू झाले, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे महत्त्व प्रतिपादित केले. पण, चाळीस मिनिटाच्या भाषणात मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांवर स्तुतिसुमने वाहिली. मोदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक करत होते तेव्हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सभागृहात उपस्थित होते.राज्यसभेत बोलताना मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन्ही पक्षांच्या खासदार शिस्त पाळतात. कितीही महत्त्वाचा प्रश्न असला तरी ते गोंधळ घालत अध्यक्षांच्या मोकळ्या जागेत येत नाहीत आणि घोषणाबाजी करून सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत नाहीत, असे मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाकडून सर्व पक्षांनी शिकवण्याजोगे आहे. राज्यसभा अध्यक्षांच्या मोकळ्या जागेत गोंधळ घातला जातो. त्याला भाजपही अपवाद नाही. भाजप जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा आम्हीही मोकळ्या जागेत घोषणाबाजी केली आहे. पण, हे वागण योग्य नव्हे. भाजपनेही धडा घेतला पाहिजे, असे खडेबोल मोदी यांनी सुनावले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button