breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! HIV पॉझिटिव्ह युवकानं फसवूण केलं लग्न, वर्षभरानंतर पत्नीला कळलं आणि…

हरियाणा:- एकीकडे कोरोनाच्या संकटात कमीत कमी लोकांमध्ये विवाह होत असताना हरियाणामधून एक धक्कादाय बातमी समोर आलेली आहे. येथे एका युवकाला HIV लागण झालेली होती, तरी त्याने गुपचूप लग्न केले होते. आता त्याच्या पत्नीही HIV पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी फसवणूक, हुंडा, छळ यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की लग्नानंतर तिच्या सासरच्यांनी तिला हुंडाबाबत त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे.

पीडित महिलेचा मागील वर्षी कैथल येथील एका तरूणसोबत लग्न झाले होते. नंतर तिला समजले की लग्नाआधीच तिचा नवरा एचआयव्ही संक्रमित होता . यानंतर सासरच्यांनी समाजाची भीती दाखविली आणि तिला शांत बसण्यास सांगितले होते. त्यानंतर या महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेनं फसवणूक, हुंडा, छळवणूक फसवणूक विविध कलमांखाली तिचा पती, मेव्हणी, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिला पोलिस स्टेशन प्रभारी शीला देवी यांनी सांगितले की, तक्रारीनंतर तिच्या पतीसह चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडले जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button