breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! मद्य समजून अ‍ॅसिड प्यायला आणि…

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मद्याची दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तळीराम निरनिराळे पर्याय शोधत आहेत. अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली. एका तळीरामानं बिअरच्या बाटलीत बिअर आहे असं समजून बाटलीच तोंडाला लावली. परंतु नंतर त्यात अ‍ॅसिड असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर त्वरित त्यानं याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित त्यांना रुग्णालात दाखल केलं. परंतु त्या ठिकाणी त्यांना मृत्यू झाला.

भोपाळमधील एका गावात राहणाऱ्या ५० वर्षीय एका व्यक्तीला सोमवारी रात्री बिअर पिण्याची इच्छा झाली. त्यांनी त्यासाठी अनेक प्रयत्नही केले. त्याचवेळी आपल्या घरात ठेवण्यात आलेल्या एका बिअरच्या बाटलीवर त्यांची नजर पडली. त्या बाटलीत बिअरचं आहे असा त्यांचा समज झाला आणि कोणाच्याही नकळत त्यांनी ती पिऊन टाकली.

परंतु नंतर त्या बाटलीत अ‍ॅसिड असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी त्वरित ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना नजीकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. परंतु उपचारादरम्यान मंगळवारी त्यांच्या मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button