breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: धक्कादायक! पोट भरण्यासाठी मजुरांवर स्मशानाबाहेर कचऱ्यात फेकलेली केळी खाण्याची वेळ

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त हाल मजुरांचे होत आहेत. देशाची राजधानी दिल्लीतही भीषण परिस्थिती आहे. दिल्लीमधील काश्मीरी गेटजवळ हजारो प्रवासी मजुरांवर यमुनेच्या किनारी झोपण्याची वेळ आली आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, या मजुरांना सडलेली केळी खावी लागत आहेत.

दिल्लीमधील निगमबोध घाटाजवळ यमुनेच्या किनारी सडलेल्या केळींचा ढीग पडला असून प्रवासी मजूर यामधून चांगली केळी शोधत पोटाची आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. निगमबोध घाटाजवळच शहरातील मुख्य स्मशानभूमी आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button