breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दोन वीरांना साश्रू नयनांनी निरोप !

मुंबई – जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या  बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड या दोन जवानांना गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. संजय राजपूत यांच्यावर मलकापूरमध्ये तर नितीन राठोड यांना लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथे हजारो नागरिकांच्या उपस्थित साश्रू नयनांनी निरोप देण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी 14 फेब्रुवारी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात बुलडाण्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील नितीन राठोड या दोन जवानांना वीरमरण आले होते. संजय राजपूत 10 दिवसापूर्वी सुट्टी संपवून काश्मीरला गेले होते. त्यांच्या अचानक जाण्याने मित्रांना मोठा हादरा बसला आहे.

संजय राजपूत कोण होते…

संजय राजपूत हे 115 बटालियनचे होते. त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. यातील एका भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. सध्या दोघे भाऊ आहेत. संजय यांना 12 वर्षीय जय आणि 11 वर्षांचा शुभम अशी 2 मुले आहेत. 8 मे 1973 रोजी जन्मलेले संजय राजपूत हे वयाच्या 23 व्या वर्षी भरती झाले होते. त्यांची सीआरपीएफमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली होती. मात्र त्यांनी पाच वर्षे वाढवून घेतली होती.

अतिशय गरीब परिस्थितीत 8 मे 1973 रोजी संजय राजपूत यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयात झाले. तर माध्यमिक शिक्षण हे जनता कला महाविद्यालयात झाले. शाळेच्या दिवसातच संजय यांना देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, म्हणून त्यांनी एनसीसी जॉईन केली. त्यानंतरच बारावीनंतर ते सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. 1996 मध्ये ते नागपूरमध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये झाली होती. संजय यांनी देशासाठी 23 वर्ष सेवा केली त्यात त्यांनी 5 वर्ष वाढवून घेतली होती. संजय राजपूत यांच्या निधनाने अवघ्या राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतिक म्हणून मलकापूरमध्ये त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button