breaking-newsराष्ट्रिय

देशात मुसलमानांपेक्षा गायी अधिक सुरक्षित – शशी थरूर

नवी दिल्ली – कथित गोरक्षकांद्वारे मारहाणीत होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी भाजपवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले आहे. भारतात अनेक ठिकाणी मुसलमानांपेक्षा गायी जास्त सुरक्षित आहेत, असे थरूर म्हणाले आहेत. याविषयावरील शशी थरूर यांचा लेख एका इंग्रजी वेबसाईटने प्रकशित केला आहे. यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

शशी थरूर यांनी लिहिले आहे कि, भाजप मंत्र्यांच्या दाव्यांमध्ये तथ्य का नसते?. आता असे वाटत आहे कि अनेक ठिकाणी मुसलमानांपेक्षा गाय अधिक सुरक्षित आहेत. मागील ८ वर्षात गोहत्या संबंधित ७० हिंसक घटना घडल्या. यामधील ९७ टक्के घटना भाजपा सरकारच्या काळात घडल्या आहेत. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील चार वर्षात २,२९० जातीय दंगली झाल्या. यामध्ये ३८९ नागरिकांचा मृत्यू तर ८,८९० जण जखमी झाले आहेत, असे थरूर यांनी आपल्या लेखात म्हंटले आहे.

दरम्यान, मागील आठवड्यातच राजस्थानमधील अलवार गावात अकबर खान याचा गो-तस्करीचा संशय आल्याने मारहाणीत मृत्यू झाला होता.

Shashi Tharoor

@ShashiTharoor

Why BJP Ministers’ claims about reduction in communal violence don’t stand up to the facts: It seems safer in many places to be a cow than a Muslim. https://theprint.in/opinion/shashi-tharoor-it-seems-safer-in-many-places-to-be-a-cow-than-a-muslim/86621/ 

Shashi Tharoor: It seems safer in many places to be a cow than a Muslim

Modi government seems to believe it can issue statements with utter disregard for the truth and people will believe them.

theprint.in

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button