breaking-newsराष्ट्रिय

देवेगौडांनी घोषणा तर वाजपेयींनी काम सुरु केलं, आता मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २५) देशातील सर्वांत मोठा रेल-रोड हा दुमजली पुलाचे उद्घाटन करणार आहेत. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे पुलासह ३ पदरी रस्ताही आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा पुल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडण्याचे काम करेन. या पुलाचा शिलान्यास १९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी घोषणा केली होती. नंतर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बोगीबेल पुलाचे काम प्रत्यक्षात सुरु केले. आता पंतप्रधान मोदी मंगळवारी अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मदिनादिवशी याचे उद्घाटन करतील.

या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे ५९२० कोटी रुपये खर्च करण्यात आला असून याची लांबी ४.९ किमी इतकी आहे. भारताच्या संरक्षण विभागाच्या दृष्टीकोनातून हा अत्यंत महत्वाचा पूल आहे. भारत-चीनच्या सीमावर्ती भागात अरुणाचल प्रदेश येथील सैनिकी तळावर अत्याधुनिक शस्त्रसाठे कमी वेळात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही दुमजली उड्डाण पूल उपयुक्त ठरेल. याच्या निर्मितीसाठी ८० हजार टन स्टील प्लेटचा वापर करण्यात आला आहे. १० हजार टन हायड्रोलिक स्टँड जॅक लावण्यात आले आहेत. अभियंत्यांच्या मते या पुलाचे आयुर्मान हे १२० वर्षे सांगितले आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे हा पूल बनवण्यासाठी ब्रह्मपुत्रच्या दक्षिण भागातून इटानगरच्या रस्त्यापर्यंतचे सुमारे १५० किमी अंतर कमी होणार आहे. तर दिब्रुगड आणि अरूणाचल यांच्यादरम्यानचे १०० किमी कमी होईल.

१६ वर्षांनंतर तयार झालेल्या या पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी हे तिनसुखिया-नाहरलगून इंटरसिटी एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वे बोगीबेल पुलावरुन आठवड्यातील ३ दिवस जाईल. १४ कोच असलेली ही चेअर कार रेल्वे तिनसुखियावरुन दुपारी रवाना होईल आणि नाहरलगूनवरुन सकाळी परतेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button