दारू पिणाऱ्यांना जज करू नका- पूजा भट्ट
मुंबई | लॉकडाउन संपण्याआधीच अनेक ठिकाणी दारूची दुकानं उघडण्यात आली. यानंतर तळीरामांनी दुकानांच्या पुढे रांगांच्या रांगा लावल्या. सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दुकानं उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र वास्तवात हे सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले. यावर आता अभिनेत्री पूजा भट्टने ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पूजाने ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘मी गेल्या तीन वर्षांपासून दारूला हातही लावला नाही आणि मी आभारीही आहे की या लोकांप्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची माझ्यावर वेळ आली नाही. पण जे मानसिक तणाव आणि दारूाची सवय सोडू शकत नाही त्यांच्याहून स्वतःला चांगलं समजणं हे चुकीचं आहे.’
पुढच्या ट्वीटमध्ये तिने लिहिले की, ‘तुम्हाला हे आवडो अथवा नाही, पण जो समाज मानसिक तणावाशी निगडीत समस्या समजून घेऊ शकत नाही त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी फक्त दारूचीच मदत मिळते. लोकांमध्ये अनिश्चितता आहे. दारू त्यांचा सहज आधार होतं. तुम्हाला या सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत? मग आधी त्यांचं दुःख कमी करा.’