breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

तेजस एक्स्प्रेस उशीरानं, ६३० प्रवशांना मिळणार भरपाई

मुंबई | महाईन्यूज

तेजस एक्स्प्रेसच्या ६३० प्रवाशांना गाडी उशीरा आल्यानं नुकसान भरपाई मिळणार आहे. अहमदाबाद- मुंबई तेजस एक्स्प्रेस १९ जानेवारीला तिच्या निर्धारीत वेळेपेक्षा एक तास उशीरा आली. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला १०० रुपये नुकसान भरपाई आयआरसीटीसी कडून देण्यात येणार आहे. नियमानुसार तेजसला एक तास उशीर झाल्यास प्रवाशांना १०० रुपये आणि दोन तास उशीर झाला तर २५० रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे. 

पश्चिम रेल्वेमार्गावरील दहिसर ते भाईंदर स्थानकांदरम्यान चर्चगेट दिशेच्या मार्गिकेवर ओव्हरहेड वायरला झालेल्या विद्युतपुरवठ्या समस्येमुळे बुधवारी दुपारी लोकलला फटका बसलेला आहे. यामुळेच मुंबई सेन्ट्रलपर्यंत येणारी तेजस एक्स्प्रेसही सव्वा तास उशिराने पोहोचलेली आहे. बुधवारी ट्रेनला  पोहोचायला उशीर झाला त्यामुळे नियमाप्रमाणे ८४९ पैकी ६३० प्रवासी जे मुंबई सेंट्रेलपर्यंत प्रवास करत होते त्यांना नुकसान भरपाई  मिळणार आहे. म्हणजे जवळपास  ६३, ००० रुपयांची नुकसान भरपाई  आयआरसीटीसीला द्यावी लागणार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button