breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगलीत अटक

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अटक करण्यात आली आहे. कुस्तीमध्ये देशभर नाव कमावलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना कार्यालयाच्या आवारात येऊन मारहाण केली होती. याप्रकरणी तहसीलदार ऋषीकेश शेळके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसंच महसूल विभागाने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर दोन आठवड्यांनी पोलिसांनी कारवाई करत चंद्रहार पाटील यांना अटक केली आहे. विटा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

३ मे रोजी हा मारहाणीचा प्रकार घडला होता. तहसीलदार ऋषीकेश शेळके यांनी वाळूचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी कारवाई केली होती. यानंतर चंद्रकांत पाटील तहसील कार्यालयात गेले होते. ऋषीकेश शेळके यांनी करण्यात आलेला दंड कमी करण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली होती. यानंतर चंद्रहार पाटील यांनी कार्यालयाबाहेर ऋषीकेश शेळके यांनी गाडीतून बाहेर ओढत मारहाण केली होती. यानंतर ऋषीकेश शेळके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रहार पाटील यांच्यासोबत त्यांचा साथीदार सागर सुरवसे यालाही अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button