breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

ट्राॅफिकमध्ये अडकलेले पार्थ पवार गाडीतून उतरुन धावत सुटले

पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवारांना बुधवारी सायंकाळी एका अनोख्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. पनवेलमध्ये होणा-या सभेला ट्राफिकमध्ये अडकल्याने उशिर होत असल्याचे लक्षात येताच पार्थ पवार यांनी गाडीतून उतरून थेट भर रस्त्यावरून पळत जाणे पसंत केले. दरम्यान, रस्त्यावरून कार्यकर्त्यांसोबत पार्थ पवार धावत असतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

पार्थ पवार बुधवारी पनवेल भागात प्रचारास होते. बुधवारी सकाळी त्यांनी सीएसटी ते पनवेल असा हार्बर लाईनवर लोकल प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांची चर्चा करून प्रवास करताना काय काय समस्या, अडचणी येतात जे जाणून घेतले. यानंतर बुधवारी दिवसभर ते पनवेल भागात प्रचारार्थ फिरत होते. सायंकाळी पनवेल भागात एक छोटेखानी जाहीर सभा होती. त्या सभेसाठी पार्थ पवार आपल्या कार्यकर्त्यांसह गाडीतून जात होते. मात्र, सायंकाळची वेळ असल्याने नेहमीप्रमाणे ट्राफिक फुल्ल होते.

त्यामुळे पार्थ यांची गाडी पुढे सरकत नव्हती. दुसरीकडे, सभेची वेळ होत चालली होती. सामान्य लोक ताटकळत बसले होते. तसेच काही मोठे नेते व कार्यकर्ते आधीच जमले होते. ते पार्थ पवार यांची वाट पाहत होते. सभास्थानाहून किती वेळात पोहचणार अशी विचारणा त्यांच्याकडे होत होती. मात्र, ट्राफिक पाहता आपण तेथे वेळेत पोहचणार नाही याची जाणीव होताच त्यांनी गाडीतून उतरून पळत जाणे पसंत केले. त्यावेळी ‘भाग पार्थ भाग’ ही वरात पाहून उपस्थितांचे थोडेसे मनोरंजन झाले. चकाचक व पॉश एसी गाडीतून फिरणारे पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरताच त्यांच्यावर अशी पळण्याची वेळ आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button