breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी
टीव्हीएस अपाची आरटीआर 200 दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/tvs-apache-4.jpg)
मुंबई : टीव्हीएस कंपनीची नवी अपाची आरटीआर 200 4 व्ही ही मोटारसायकल नुकतीच दिमाखात लाँच झाली आहे. आकर्षक लुकसहची ही मोटारसायकल दिवाळीपूर्वी आल्याने ग्राहकांना खरेदीची संधी चालून येणार आहे. खास करून युवा वर्गालाही ही गाडी अधिक पसंत पडेल, असे सांगितले जात आहे. 1 लाख 31 हजारहून अधिक (एक्सशोरूम, दिल्ली) या गाडीची किंमत असणार असून अनेक वैशिष्ठय़े यात आहेत. ग्लॉस ब्लॅक, पर्ल व्हाइट व मॅटी ब्लू या तीन रंगात ही गाडी येणार असून स्पोर्ट, अर्बन व रेन या तीन गटात गाडी सादर केली आहे.