breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टपरी पथारी हातगाडी धारकांनी दहा हजार रुपये स्वाधिन योजनेचा लाभ घ्यावा – उपयुक्त अजय चाठणकर

पिंपरी | महाईन्यूज

टपरी पथारी हातगाडी धारकांना दहा हजार स्वनिधी म्हणून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने टपरी पथरी हातगाडी पंचायतच्या वतीने टपरी पथारी हातगाडी धारकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जागृती केली जात आहे.

लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी त्याचे ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यासाठी त्यांना मोफत मार्गदर्शन केले जात आहे. पंचायतच्या कामाची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका नगरवस्ती विभागाचे उपयुक्त अजय चाठणकर यांनी पंचायत कार्यालयास भेट देऊन कामाची पाहणी केली. गोरगरीब फेरीवाल्यांना लाभ मिळत असल्याबाबत त्यांनी संघटनेचे कौतुक केले.

यावेळी योजनेच्या लाभार्थी महिला आणि पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपायुक्त अजय चाठणकर यांचा सन्मान केला. यावेळी काजल कांबळे, अधिकारी ज्योती भोसले, राकेश पाटील आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button