breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टक्केवारीवरुन ‘स्थायी’चा वाद चव्हाट्यावर; सभापतींच्या कारभारावर विरोधक नाराज

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायीची सभा प्रथा परंपरा की कायद्याद्वारे चालविणार, हे सत्ताधारी भाजपच्या सभापतींनी स्पष्ट करावे, तसेच जर कायद्याने स्थायी चालवायची असेल तर स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, स्थायी सभेचे चित्रीकरण करुन महासभेप्रमाणे स्थायीत देखील नागरिकांना बसण्याची परवानगी देवून पारदर्शक कारभार करावा, अशीही मागणी केली.

दापोडीच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या अग्नीशमन जवान, कर्मचा-यांना श्रद्धांजली अर्पण करुन स्थायी सभा तहकूब करण्यात आली. स्थायी समितीची आज (बुधवारी) सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.

स्थायी सभेची सुरुवात वादावादीतून झाली. दरवेळेस सभा सुरु होण्यापूर्वी पूर्व बैठक घेण्यात येते. परंतू, आज ही सभा न घेतल्याने वादाला फोडणी झाली. सत्ताधारी भाजप सदस्यांसह विरोधकांना सभापतीने विश्वासात न घेता एकाधिकार शाहीने सभा चालवत असल्याचा आरोप राष्टवादीचे नगरसेवकांनी केला.

स्थायी सभापतींना ही सभा प्रथा परंपरेने चालते की कायद्याप्रमाणे चालते असा प्रश्न विचारला. त्यावर सभापतींनी कायद्याप्रमाणे चालते असं सांगितले. सभा जर कायद्याने चालते तर टक्केवारी कशी मिळते. स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा. सभेचे चित्रीकरण करा. तुमचा पारदर्शक कारभार आहे. तो पिंपरी चिंचवडकराच्या समोर येवू द्या, असा सवाल राहुल कलाटे यांनी उपस्थित केला.

तर राष्ट्रवादीचे मयुर कलाटे, पंकज भालेकर यांनी साथ दिली. त्यावर सभापती मडिगेरी यांनी सभा माझ्या मनाप्रमाणे चालविणार असे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक भडकले. धमकी देताय का? असा आरोप विरोधी सदस्यांनी केला. सभा ही सदस्यांच्या मताप्रमाणे चालते. त्यासाठी कायदा आहे. असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगताच दुसऱ्याचे ऐकून सभा चालवू नका, असा टोला मयुर कलाटे यांनी सभापतींना लगावला.

यावर भाजपाचे स्थायी सदस्य शितल शिंदे यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. त्यावर आपण पूर्व बैठक घेवून पुढील काय निर्णय घ्यायचा ते ठरवू, तोपर्यंत ही सभा तहकूब करा. असं त्यांनी सांगितले. त्यावरुन महापालिकेच्या मृत पावलेल्या जवानासह मजुरास श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button