breaking-newsराष्ट्रिय

झाकीर नाईकला आज भारतात आणणार?

नवी दिल्ली-  वादग्रस्त ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा संस्थापक डॉ. झाकिर नाईकला मलेशियात अटक करण्यात आली असून आज त्याला भारतात आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मलेशियाच्या पोलिसांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी नाईकने मात्र अटक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. एका इंग्रजी वर्तमानमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा आणि चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेल्या नाईकविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व सक्तवसुली संचालनालयाने (इडी) अनेक एफआयआर नोंदवले आहेत. त्यामुळे नाईक मलेशियात लपून बसला होता. पीस टीव्हीवरील नाईकच्या भाषणामुळे ढाकामध्ये २०१६ मध्ये हल्ला झाला होता, असा दावा बांगलादेशने केला होता. या हल्ल्यात एका भारतीय तरुणीसह २२ लोक ठार झाले होते.
चिथावणीखोर भाषण देणाऱ्या नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला २०१६ मध्ये बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नाईकच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळेच तो मलेशियात पळाला होता, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी पूर्ण झाली असून आज त्याला भारतात आणण्यात येत असल्याचे वृत्त इंग्रजी वर्तमानमानपत्राने दिले आहे.दरम्यान, नाईकने अटक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मला अटक झाली असून आज मला भारतात आणण्यात येणार असल्याचे वृत्त निराधार आहे. जोपर्यंत मला सुरक्षित वाटत नाही. तोपर्यंत भारतात येण्याचा माझा कोणताही इरादा नाही. निष्पक्ष सरकार आल्यावरच मी माझ्या मायदेशी परतेल, असे नाईकने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button