breaking-newsक्रिडा

झहीर म्हणतो, ‘मुंबईकडून खेळताना युवराजच्या खांद्यावर असेल ही जबाबदारी’

मुंबई इंडियन्स संघाच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती झालेल्या झहीर खानने युवराज सिंग मुंबई संघासाठी महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मंगळवारी (१८ डिसेंबर २०१८) झालेल्या आयपीएलच्या १२ व्या पर्वाच्या लिलावामध्ये युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने एक कोटींची बोली लावून विकत घेतले आहे. युवराजचा संघात समावेश झाल्याने सर्वचजण खूप उत्साहित असल्याचे झहीरने सांगितले.

भारतीय संघामधील माजी संघ सहकारी असणाऱ्या युवराजचा अनुभव मुंबई संघाला उपयोगी ठरेल असा विश्वास झहीरने व्यक्त केला. युवराज मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू म्हणून संघात असेल. आम्ही मागील बऱ्याच काळापासून संघामध्ये मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजाच्या शोधात होतो अशी माहिती युवराजने ‘क्रिकेट नेक्सट’ला दिली आहे. मधल्या फळीला भक्कम करण्याच्या उद्देशानेच आम्ही हनुमान विहारीवर मोठी बोली लावत होतो. घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये हनुमाचा अनुभव दांडगा असल्यानेच आम्ही त्याच्यासाठी बोली लावल्याचे झहीर म्हणाला. हनुमाबद्दल आम्ही विचार करत होतो तरी मधल्या फळीतील खेळाडू म्हणून युवराज हा संपूर्ण पॅकेज आहे. त्याच्याकडे असणारा अनुभव मोठा आहे. तो एक धडाकेबाज टी-२० फलंदाज आहे. त्यामुळेच त्याच्यावर लावण्यात आलेला पैसा योग्यच असल्याचे झहीरने सांगितले.

मुंबईत झालेली युवराजची निवड म्हणजे त्याच्यासाठी चांगली संधी असून त्याने काय करावे याबद्दलही झहीरने मत व्यक्त केले आहे. युवराजच्या क्षमतेवर कोणालाच शंका नाहीय. या पर्वाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भन्नाट खेळ करत जगभरातील क्रिडा प्रेमींना आपली क्षमता दाखवण्याची संधी युवराजला मिळणार आहे. युवराज मुंबईच्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आम्हाला असल्याचे झहीरने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button