breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये पिंपळ पानावर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची सुवर्णसंधी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवडमध्ये एक अनोखे चित्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सामाजिक, राजकीय, कला, क्रिडा अशा क्षेत्रातील नामवंतांची तब्बल 450 चित्रे पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही चित्रे पिंपळ पानवर रेखाटलेली आहेत.

पी. एन. गाडगीळ एण्ड सन्स यांच्या सौजन्याने रघुनाथ गणपत सासवडकर यांनी ४० वर्षांहून अधिक काळ पिंपळ पानावर चित्रे रेखाटली आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची अंदाजे 450 चित्रे तयार केली आहेत़. यातील काही चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनातून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे.

पिंपळ पाणावरील चित्रांचे एकमेव प्रदर्शन चिंचवड येथील पी. एन. गाडगीळ एण्ड सन्स चाफेकर चौक यांच्या आर्ट गॅलरीमध्ये १२ ते १६ फेब्रुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले रहाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button