breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चांगल्या कामाचे कौतुक केल्यास काम करण्याची ऊर्जा वाढते – महापौर माई ढोरे

क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

पिंपरी | प्रतिनधी

कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या यशस्वी व्यक्तीचा सन्मान करून त्याचे कौतुक केल्यास त्याला अधिक उत्साहाने काम करण्याची उर्जा प्राप्त होत असते.  या माध्यमातून इतरांना देखील प्रोत्साहन मिळून यश संपादन करण्याची दिशा मिळत असते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. 

पिंपरी चिंचवड परिसरातील क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम महापौर दालनात पार पडला. सांगवी येथील शिवामृत ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महापौर ढोरे यांच्या हस्ते हा समारंभ पार पडला. त्या वेळी सत्कारार्थींना शुभेच्छा देताना महापौर ढोरे बोलत होत्या.

सत्कारार्थींना शिवामृत ग्रुपच्या वतीने सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक संतोष कांबळे, मोरेश्वर शेडगे, शिवामृत ग्रुपचे प्रमुख सुनिल साठे आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या की, कोरोना काळात पोलीस दलाने जीवाची पर्वा न करता काम केले.  तसेच अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील महत्वपूर्ण जवाबदारी पार पाडून नागरी हितासाठी काम केले.  त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.  चांगले काम करणा-याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे.  त्यातून अधिक उत्साहाने आणि जोमाने काम करण्याची उर्जा प्राप्त होत असते.  शहरातील खेळाडू देखील प्रचंड मेहनतीने यश संपादन करीत असतात.  शहराच्या नावलौकिकात खेळाडूंनी नेहमीच भर घातली आहे.  या खेळाडूंनी अनेकोत्तम खेळाडू घडवावेत, असे आवाहन यावेळी महापौर ढोरे यांनी केले. 

सत्कारार्थींची नावे  –

 सुधा खोले (कबड्डी प्रशिक्षक), मृदुला महाजन, सुनिता फडके, विजया फर्नांडिस, आरती कांबळे (शैक्षणिक क्षेत्र), मनिषा जाधव (अॅथलेटिक्स खेळाडू), ऐश्वर्या साठे (क्रिकेट क्षेत्र), खुशी मुल्ला (क्रिकेट खेळाडू), सोनल बुंदेले (धनुर्विद्या खेळाडू), स्वाती रानवडे, राखी जगताप (कराटे प्रशिक्षक), यशश्री राजभारत (हॉकी खेळाडू), पार्वती बकाळे (क्रिकेट प्रशिक्षक).

पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले आणि मोहन जाधव यांचा देखील विशेष सन्मान महापौरांच्या हस्ते करण्यात आला.   स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी देखील सत्कारार्थींना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button