breaking-newsपिंपरी / चिंचवड

गुरुंनी दिलेली दीक्षा मोक्षाकडे नेते – जगदगुरु डॉ. शिवाचार्य

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जीवनातील अनावश्यक मोहपाशातून मुक्ती मिळविण्यासाठी दीक्षा धारण करावी. ज्याप्रमाणे संसारात आई, वडील मुख्य मार्गदर्शक असतात. त्याच प्रमाणे संसारी जीवनातून अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग गुरु दाखवतात. गुरुंनी दिलेली दीक्षा मोक्षाकडे नेते. संसारी जीवनात वयाला महत्व आहे. मात्र, अध्यात्मिक जीवनात अध्यात्म कळण्याला महत्व आहे. असे मार्गदर्शन श्री श्री श्री 1008 जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य यांनी केले.

महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शनिवारी प्राधिकरण मोशी परिसरात जगद्‌गुरु महास्वामींची कुंभकलशासह मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीत 501 महिला मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. यानतंर अभिषेक विद्यालय येथे श्रीमद्‌ श्रीशैल्य सुर्यसिंहासनाधिश्वर महास्वामीजी श्री श्री श्री 1008 जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री शैल्य महापीठ यांचे दर्शन, अनुग्रह, दीक्षाविधी, अय्याचार (व्रतबंध), सामुहिक ईष्टलिंगपूजा, दिक्षाविधी आदी कार्यक्रम झाले. यानंतर भाविकांना मार्गदर्शन करताना जगदगुरु महास्वामीजी बोलत होते.

महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक गुरुराज राजय्या चरंतीमठ यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात हजारो कुटूंबांचे संसार उध्वस्त झाले. या पुरग्रस्त भागात शंभर घरे बांधून देण्याचा संकल्प श्रीमद्‌ श्रीशैल्य सुर्यसिंहासनाधिश्वर महास्वामीजी श्री श्री श्री 1008 जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य यांनी केला आहे.

यावेळी श्री. ष. ब्र. 108 रेणुक शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ (मंद्रुपकर), श्री.ष.ब्र. 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ (बेळंकीकर), श्री.ष.ब्र. 108 डॉ. धर्मरत्न मल्लिकार्जून शिवाचार्य स्वामीजी (होटगीकर), श्री.ष.ब्र. 108 महादेव शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ (वाईकर) आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक मल्लया स्वामी, नाशिक विभागीय महसूल उपायुक्त दिलीप विरूपाक्ष स्वामी, अशोक रुकारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, कार्याध्यक्ष आण्णाराय बिरादार, स्वागताध्यक्ष शिवाजी साखरे, संयोजक राचय्या चरंतीमठ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे व्यवस्थापनात श्री मल्लिकार्जून प्रतिष्ठान, प्राधिकरण, पिंपरी चिंचवड जंगम समाज, श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी समाधी प्रतिष्ठान सुदूंबरे, वीरशैव लिंगायत समाज आदींनी सहभाग घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button