breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

गुप्त कारवायांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर; पाकिस्तानी गुप्तहेराचा खुलासा

भारतीय सैन्याची गोपनीय माहिती मिळवण्याचा ISI चा डाव सर्तक असलेल्या तपास यंत्रणांनी उधळून लावला आहे. आयएसआयच्या कटामध्ये सहभागी असलेल्या अबिद हुसैन याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल अ‍ॅपलिकेशन वापरण्याचा सल्ला दिला होता. तपास यंत्रणांच्या नजरेतून सुटण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापर असा सल्ला अबिद हुसैनने दिला होता. अबिद हुसैन नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता.

आपण भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहोत हे अबिद हुसैनला माहित सुद्धा नव्हते. अबिदने माहिती मिळवण्यासाठी ज्या व्यक्तीला हेरले होते, तो लष्करी सेवेत काम करतो असा त्याचा समज होता. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरता का? म्हणून अबिदने त्या व्यक्तीकडे विचारणाही केली होती. लष्करात व्हॉट्स अ‍ॅप वापरण्याची परवानगी नाही असे समोरच्या व्यक्तीने सांगितले, तेव्हा लपून-छपून व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी त्याने आग्रह धरला होता.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना रेड हँड पकडण्यासाठी त्यांना प्रलोभन दाखवण्यात आले होते. अबिद हुसैन आणि ताहीर खान हे जानेवारी महिन्यापासून तपास यंत्रणांच्या रडावर होते. “लष्करातील जूनियर रँकिंगच्या अधिकाऱ्यांना हेरुन त्यांच्याशी मैत्री वाढवायचे व त्यांच्याकडून सैन्य तुकडयांच्या सीमेवरील हालचालींसदर्भात माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा” असे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं. या कारवाईमुळे आधीपासूनच खराब असलेल्या भारत-पाकिस्तान संबंधात आणखी तणाव निर्माण होणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण करणारी कृती केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी ऑफिशिअल सिक्रेट कायद्यातंर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button