breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खासदार बारणे समर्थकांना ‘वाकून पहाणे’ पडले महागात, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी खडसावले!

– पार्थ पवार यांचे व्यक्तिगत फोटो व्‍हायरल केल्यामुळे तीव्र नाराजी
– समाज माध्यमांवर व्‍हायरल केलेले आक्षेपार्ह फोटो अखेर काढून टाकले
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या खासगी जीवनातील फोटो आक्षेपार्ह मजकूर लिहून सोशल मीडियावर‘व्‍हायरल’ करणे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीरंग बारणे आणि समर्थकांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बारणे यांना फोन करुन सबंध प्रकाराबद्दल खडसावले आहे. तसेच, सोशल मीडियावर सुरू असलेला बिभस्तपणा तात्काळ थांबवावा, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, वरिष्ठ पातळीवर सोशल मीडियावरील ‘अपप्रचार’ अंगलट आल्यामुळे ‘PCMC Shivsena official’ या संकेतस्थळावरील संबंधित आक्षेपार्ह फोटो काढून टाकण्यात आले आहेत. एका वाढदिवसाच्या जाहीर पार्टीतले खासगी फोटो ‘व्हायरल’ करून पार्थ पवार यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. महाविद्यालयीन जीवनात मित्र-मैत्रिणींसोबत आयोजित केलेल्या पार्टीचे फोटो (जे आधीच सोशल मीडियावर आहेत ) बिभस्त आशयाच्या ओळी टाकून ‘व्हायरल’ केले. परिणामी, समाजमाध्यमांमधून पार्थ पवार आणि राष्ट्रवादीवर नकारात्मक चर्चा जाणीवपूर्वक पसरवण्यात आली होती.
याउलट, राष्ट्रवादीच्या समर्थकांनीही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पार्टी आणि काही समारंभातील फोटो व्‍हायलर केले. तसेच, भाजप आणि सेनेतील नेत्यांच्या काही कथित फोटोद्वारे प्रतिहल्ला करण्यास सुरूवात केली. समाजमाध्यमांत विकासाचे मुद्दे सोडून राजकीय चिखलफेक सुरू झाली होती. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो व्‍हायरल झाल्यामुळे ही बातमी थेट ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचली. संतापलेल्या आदित्य यांनी थेट बारणे यांना फोन करुन नाराजी व्यक्त केली आहे, असे समजते.
निवडणूक प्रचारादरम्यान सलग पाचवेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळवल्याचे ‘ब्रँडिंग’ खासदार बारणे यांनी यशस्वीपणे केले. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत होता. मात्र, बारणे समर्थकांनी ‘सोशल मीडिया’वर ऐन मतदानाच्या तोंडावर प्रतिस्पर्धी उमेदवार पार्थ पवार यांचे खासगी फोटो व्‍हायरल केले. त्यामुळे शिवसेना आणि बारणे यांच्यावर चौफेर टीका होवू लागली. यात पुन्हा राष्ट्रवादीच्या समर्थकांनीही आदित्य ठाकरे आणि विश्वजीत बारणे यांच्या संबंधित कथित फोटो व्‍हायलर केल्यामुळे वातावरण गढूळ झाले आहे.
****
‘आदित्य संवाद’ कार्यक्रमाला गालबोट?
दोनच दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आदित्य संवाद’ हा तरुणांशी संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या तरुणांना प्रश्न विचारले जात होते. विशेष म्हणजे, वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना कार्यक्रमासाठी मनाई करण्यात आल्याचे समजते. या कार्यक्रमात काही तरुणांना पुर्वनियोजित तयारी करुन बसवण्यात आले होते. ठरलेले प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत नाकरात्मक चर्चा सुरू होती. त्यातच आदित्य ठाकरे यांचे काही फोटो सोशल मीडियावर येवून धडकले. त्यामुळे ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमाला गालबोट लागले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button