breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खड्ड्यात पडलेल्या मुलाला वाचवताना अग्निशामक दलाचे कर्मचारीही अडकले खड्ड्यात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेले अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी देखील खड्ड्यात पडले. त्यांना खड्ड्यातून बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ही घटना आज रविवारी (दि. 1) सायंकाळी दापोडी येथे घडली.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोडी येथे पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी प्रचंड मोठा खड्डा खोदलेला आहे. या खड्ड्यात आज सायंकाळी एक मुलगा पडला. त्याच्या अंगावर माती पडल्याने तो खड्ड्यात अडकला. याची माहिती स्थानिकांनी आग्निशामक दलाला कळविली.

त्यावर अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. मुलाला काढत असताना अग्निशामक दलाचे दोन कर्मचारी देखील खड्ड्यात पडल्याची धक्कादायक माहिती कळत आहे. त्यांना वाचवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी तिघांना खड्ड्याबाहेर काढण्याचे काम करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button