breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

खंडाळा घाटात दरड कोसळली, वाहतुकीवर परिणाम

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही. दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तूर्तास जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली आहे. दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

लोणावळा व खंडाळा परिसरात शनिवारपासूनच मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसामुळे आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सरकून द्रुतगती मार्गावर आला. याबाबत माहिती मिळताच खोपोली बोरघाट पोलीस व आयआरबीची मदत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले असून मार्गावरील दरड बाजुला करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. परिणामी, मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये या भागात सातत्याने दरड कोसळत असल्याने कोट्यावधी रुपये खर्चून सुरक्षा जाळी बसवण्यात आली, तरीही दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button