breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कोविड-19’ नियमाची कडक अंमलबजावणीस ‘स्पेशल टास्क फोर्स’ तयार करा

आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरा यांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा फैलाव चांगलाच वाढला आहे. अनलाॅक झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लघंन होवू लागले आहे. त्यामुळे मास्क न लावणे, रस्त्यावर गुटखा पान खाऊन थूकंणे, सोशल डिस्टन्स राखणे ह्यासह अन्य कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. दरम्यान, कोरोना नियमाची कडक अमंलबजावणी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करावी, अशी मागणी गणेश बोरा यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात कोरानाची वाढणारी रुग्ण संख्या, तोकडी पडणारी आरोग्य सुविधा पाहता पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ शकते, पण तो लॉकडाउन ह्या कामगार नगरीला परवडणारा नाही.

त्याकरिता कोरोनाच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणे हेच उत्तम राहील, शहरात सध्या नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर कमी प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. तसेच कोरोनाच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यास विशेषाधिकार असणारी स्पेशल टास्क फोर्स बनवावी. इतर विभागातील ही कर्मचारी वर्गास पुढील आठ दिवसात कारवाईस जागोजागी उतरावे. गरज भासल्यास आपण सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक ह्यांनाही ह्या मध्ये सामावून घ्यावे. यामुळे नागरिकांमध्ये नियम पाळण्यास जरब बसेल आणि कोरोनाला आळा बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button